मराठा महासंघाच्यावतीने राजवाड्यासमोर निषेध

राजकोट पुतळा दुर्घटना
Edited by: विनायक गांवस
Published on: August 29, 2024 07:43 AM
views 225  views

सावंतवाडी : अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने मालवण राजकोट येथे पुतळा कोसळल्याच्या घटनेचा गुरुवारी निषेध करण्यात आला. राजवाड्यासमोर निषेध केल्यानंतर तहसीलदार श्रीधर पाटील यांना मालवण राजकोट येथील घटनेची कसून एसआयटी चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

 यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत, तालुका अध्यक्ष अभिजीत सावंत ,उमाकांत वारंग ,शिवदत्त घोगले ,दिगंबर नाईक, संतोष तळवणेकर, संजय लाड, ॲड. संदीप निंबाळकर आदी उपस्थित होते.