
चिपळूण : आधुनिक तंत्रज्ञान आणि अचूक निदानासाठी वालावलकर रुग्णालय कायमच अग्रेसर आहे आणि सतत नव नवीन तंत्रज्ञान कोकणवासीयांच्या उपचारासाठी उपलब्ध व्हावे ह्याच तळमळीने फ्लो सायटोमेट्री सारखी अद्ययावत मशीन सुविधा सुरु करण्यात आली आहे. या नवीन अद्ययावत सुविधेमुळे रक्तांच्या नमुन्यातून अनेक प्रकारच्या आजारांचे निदान शक्य होणार आहे . उदाहरणार्थ रक्तातील पेशींचे वर्गीकरण,रक्तविकारांचे (हेमॅटोलॉजिकल), कॅन्सर च्या आजारांचे निदान आणि इंमुनोफिनोटीपिंग तसेच एच आय व्ही बाधित रुंगांची सी डी ४ पेशींची संख्या ज्यावरून त्यांच्यातील प्रतिकार शक्तीचे मूल्यमापन करून योग्य औषधांची निवड करणे शक्य होणार आहे. जेणेकरून सी डी ४ संख्या अधिक कार्यक्षम व अचूक मिळणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होऊन परिणाम अधिक जलद मिळू शकतात प्रतिकारशक्तीशी (इम्यून डिसॉर्डर्स) निगडित आजारांचे अचूक निदान होऊ शकते.
विविध विषयांच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अचूक निदान करणारे हे कोकणातील एकमेव तंत्रज्ञान रुग्णांसाठी खुले करण्यात आले आहे. हे नवीन उपकरण आणि सुविधा कार्यान्वित करण्यासाठी लागणारे प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि रिपोर्ट देणारे डॉक्टर्स यांची निदान करताना मदत होणार आहे. या यंत्रणेसाठी , रामा पुरुषोत्तम फौंडेशन ह्या सेवाभावी संस्थेने भरघोस मदत देऊन सामाजिक भान जपले आहे. हि सुविधा एका वातानुकूलित कक्षा मध्ये स्थापन करून संशोधनासाठी शात्रज्ञ डॉक्टर रिटा मुल्हेरकर जातीने मशीन च्या संशोधनासाठीच्या उपगोयीतेवर लक्ष ठेवणार आहेत.