
वेंगुर्ला : शिरोडा ग्रामपंचायत हद्दीतीलं समस्यांमुळे ग्रामस्थांना त्रास होत आहे. त्यामुळे खालील नमूद केलेल्या समस्या सोडवण्याबाबत ग्रामपंचायतला शिरोडा युवासेनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. यावेळी युवासेना उपतालुकाप्रमुख रोहित पडवळ, युवासेना उपविभाग प्रमुख शुभम गावडे, पुंडलिक परब शाखाप्रमुख, विराज सारंग उपशाखा प्रमुख, शिवसैनिक संदिप परब, उत्तम आरोसकर, चेतन शिरगावकर, शुभम गावडे, चैतन्य न्हावेलकर, राज मोरजकर, विघ्नेश धानजी आदी युवासेना, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
१) वार्ड नंबर ३ मधील दिपक परब गिरण ते सुनिल मठकर दुकान पर्यंत गटाराचे देखभालीचे काम अर्ध्यास्थितीत आहे. (गटारातील माती काढून गटार मोकळा करणे)
२) वार्ड नंबर ३ मध्ये ग्रास कटर फिरवण्याचे काम अर्धवट झालेले आहे. (परबवाडी मध्ये ग्रास कटर मारलेला नाही.)
३) वार्ड नंबर ४ भाजी मार्केट मधून कचरा गाडी नेण्याची वेळ एकतर सकाळी लवकर नाहीतर संध्याकाळी उशिरा करावी.
४) वार्ड नंबर ४ भाजी मार्केटमधील संडास बाथरूम याची देखभाल केली जात नाही. त्यामुळे परिसर अस्वच्छ राहतो.
५) वार्ड नंबर ४ भाजी मार्केट मधील साचलेला कचरा व्यवस्थित स्वच्छ केला जात नाही.
६) वार्ड नंबर ४ भाजी मार्केट मध्ये गर्दीच्या दिवशी गाडी पार्किंगमुळे विक्रेत्यांना भरपूर त्रास होतो.
वरील समस्यांबाबत निवेदन देण्यात आलं आहे.