
सिंधुदुर्गनगरी : युनिसेफ आणि नेहरु युवा केंद्र यांच्यावतीने 14 ते 15 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे राज्यस्तरीय युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तरीय युवा संसदेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील एकूण 72 युवकांची निवड करण्यात आली. युवा संसदेसाठी मंत्रीपदाच्या उमेदवारीसाठी जिल्ह्यातून संरक्षणमंत्री पदासाठी यशोधन प्रसाद देवधर यांची तर संसद सदस्यपदी सिध्दी गोसावी यांची निवड करण्यात आली.
नव्याने सादर केलेल्या अग्निपथ योजनेसह गुप्तचर यंत्रणा, तटीय सुरक्षा यासारख्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित चर्चा करण्यात आली. पहिल्या दिवशी मुंबई येथील विधानभवन, राजभवन यांची भेट घेतली. तेथील कामकाज केसे चालते याबद्दल युवकांना माहिती देण्यात आली. दुसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई विद्यापिठात कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर युवा संसदेला सुरुवात झाली सर्व मंत्री मंडळ आणि सदस्यांना सामुहिक शपथ घेतली. देशातील विविध प्रश्न विरोधी पक्षाच्यावतीने सभागृहात मांडण्यात आले. त्याला मंत्रिमंडळाने अपेक्षित अशी उत्तरे हि दिली. यावेळी मंत्री मंडळात 3 विधयके मांडण्यात आली आणि 3 विधेयके मंजूर केली गेली. युवा संसद युवकांना भविष्यात राजकीय क्षेत्रात जाण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरेल.
या कार्यक्रमाच्या शेवटच्यादिवशी संध्याकाळी स्थानिक कलाकारांचा लोकनृत्याचा कार्यक्रम आयोजित केला यात राज्यातील संस्कृती दर्शवणारी लोकनृत्ये सादर करण्यात आली. या राज्यस्तरीय युवा संसद कार्यक्रम नेहरु युवा केंद्राचे राज्य निदेशक प्रकाश कुमार मनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.