विवेकानंद सावंत यांना राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार !

Edited by: जुईली पांगम
Published on: January 27, 2024 14:06 PM
views 181  views

सावंतवाडी : विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचे कलाशिक्षक विवेकानंद सावंत हे आदर्श कलाध्यापक ठरलेत.  महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाच्या राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलंय. यासाठी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.  

कलाशिक्षक विवेकानंद सावंत यांच्या शैक्षणिक आणि कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आलाय. अध्यापन कार्यात ते गेली 38 वर्ष कार्यरत आहेत. उपक्रमशील शिक्षक अशी त्यांची ओळख आहे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. ग्रेड परीक्षेमध्ये त्यांचे विद्यार्थी कायमच अव्वल श्रेणीत उत्तीर्ण होण्याची त्यांची परंपरा कायम आहे. समूहगीत, गायन स्पर्धेत चांगला ठसा उमटवतात. या त्यांच्या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आलाय. 

या पुरस्कारासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, शालेय समिती, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलंय.