
देवगड : इंद्रधनू - देवगड (रजि.) संस्थेच्यावतीने व माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका अॅड. प्रणाली मिलिंद माने यांच्या सहकार्याने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या गुरुदक्षिणा प्रेक्षागृहानजीक भव्य पटांगणावर 'आनंद मेळा'चे आयोजन करण्यात आले आहे. या आनंद मेळ्यांतर्गत प्रथमच राज्यस्तरीय 'मिस इंद्रधनू सौंदर्यवती स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कलासार्थ इव्हेंट- रत्नागिरी यांच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांसह बच्चे कंपनीसाठी विविध फनीगेम्स, खवय्यांसाठी 'खाऊ गल्ली' ही भरविण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रसाद कुळकर्णी व नगरसेविका ऍड. प्रणाली माने यांनी यांनी दिली.
'इंद्रधनू देवगड' या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या सभेत 'आनंद मेळ्या'तील कार्यक्रमांची रुपरेषा ठरविण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष किसन सूर्यवंशी, सचिव प्रशांत वाडेकर, सहसचिव उदय रुमडे, खजिनदार तुषार पाळेकर, सदस्य भावेश पटेल, राजीव पडवळ, आनंद रामाणे, दिनेश पटेल, वैभव केळकर, मिलिंद मोर्ये, यतीन कुळकर्णी, प्रशांत पटेल, मिलिंद माने आदी उपस्थित होते. आनंद मेळ्यानिमित्त इंद्रधनू संस्थेच्यावतीने सायंकाळी ६ वा. प्रथमच राज्यस्तरीय मिस इंद्रधनू सौंदर्यवती स्पर्धा २०२३' चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या सौंदर्यवतीस रोख १५ हजार रुपये, मानाचा 'मिस इंद्रधनू सौंदर्यवतीचा किताब, सन्मानचिन्ह व प - शस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर द्वितीय क्रमांकाच्या सौंदर्यवतीस रोख ७ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक तसेच तृतीय व - मांकाच्या सौंदर्यवतीस रोख ५ हजार रूपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. बेस्ट कॅटवॉक, बेस्ट कॉश्च्युम, बेस्ट हेअर स्टाईल, बेस्ट स्माईल, 'बेस्ट अॅपिरियन्ससाठी प्रत्येकी २ हजार रूपये, सन्मानचिन्ह व प - शस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी स्पर्धक संख्या मर्यादित आहे. नाव नोंदणी १८ जानेवारीपर्यंत करावयाची आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी यतीन कुळकर्णी (९४२३३०३७८९ ) व राजीव पडवळ (९४२०००९०९१) यांच्याशी संपर्क साधावा.
कलासार्थ इव्हेंट, रत्नागिरी यांचा देशभक्तीपर नृत्य, सोलो व ग्रुप डान्ससह मनोरंजनात्मक कलाविष्काराचे सादरीकरण होणार आहे. सायंकाळी ४ वा. पासून लहान मुलांसाठी विविध फनीगेम्स व धम्माल मस्तीचे खेळ असणार आहेत. तर खवय्यांसाठी खाऊगल्लीही भरविण्यात येणार आहे. यात विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल असणार आहेत. स्टॉल नोंदणीसाठी उदय रुमडे (९४२२५९६२९६) यांच्याशी संपर्क साधावा. नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.