करुळ इथं १३ फेब्रुवारीला राज्यस्तरीय ढोलवादन स्पर्धा !

गणेश जयंती निमित्त आयोजन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 25, 2024 11:38 AM
views 136  views

वैभववाडी :  माघी गणेश जयंती उत्सव निमित्त श्री. रामेश्वर युवा मित्र मंडळ करुळ (भोयेडेवाडी) यांच्या वतीने राज्यस्तरीय ढोलवादन स्पर्धा मंगळवार दि. १३ फेब्रुवारी २०२४ रात्री ९:३० वा गणेश मंदिर याठिकाणी संपन्न होणार आहे.

  स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रुपये १० हजार व आकर्षक सन्मानचिन्ह, व्दितीय क्रमांकास रु. ५ हजार व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास रुपये ३ हजार व सन्मानचिन्ह, उत्तेजणार्थ रोख रु. २ हजार, उत्कृष्ठ ढोलवादक, उत्कृष्ठ ताशावादक, उत्कृष्ठ झांजवादक, (प्रत्येकी रोख रु.५०१/- व  सन्मानचिन्ह),

देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेची प्रवेश फी रु. ५००/- रोख/ऑनलाईन स्वीकारण्यात येईल. प्रथम दहा येणा-या ढोल पथक स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येईल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतील पथकांनी त्वरित नोंदणी करावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष हिंदूराव पाटील यांनी केले आहे.

      स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे - प्रत्येक पथकामध्ये १३ सदस्य असतील. स्पर्धेत ८ ढोल, ३ ताशे, १ निशान, १ झाज वापरण्यात येईल, सहभागी होणा-या ढोल ढोलपथकांनी आपल्या पथकाचे नांव, संपूर्ण पत्ता व पथक प्रमुखाचे नाव कृपया त्वरित कळवावे.  प्रत्येक पथकाला २० मिनिटे वेळेचे बंधन असेल याची पथकाने नोंद घ्यावी.  ढोल किंवा ताशाची काठी पडल्यास गुण वजा करण्यात येतील. संघातील सर्वांचे नुत्य वादनात समन्वय असावा जेणेकरुन प्रेक्षकांचा जोश वाढेल व मनोरंजन होईल. स्पर्धेमध्ये वादकाचा जोश व चेह-यावरील हावभाव विचारधीन घेतला जाईल. ढोलवादन, ताशे, झांज, निशान, वेशभूषा समन्वय हे सर्व निरीक्षण करुन त्यावर गुण दिले जातील. ढोल, ताशा फुटल्यास स्पर्धकाने रिंगण सोडू नये. ढोल किंवा ताशा बदलण्याची मूभा आहे. स्पर्धकांनी मद्यपान (दारुप्राशन) केले असल्यास त्या संघाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल. सर्व संघाची उपस्थिती रात्रौ ८ वा. असावी. स्पर्धा ठीक ९ वाजता चालू होईल. दि. ०५/०२/२०२४ पर्यंत संपर्क प्रमुखांकडे आपली नावे फी सह नोंदवावीत. पंचाचा निर्णय अंतिम राहील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी.

स्पर्धा नियोजनात बदल करण्याचा सर्व अधिकारी श्री. रामेश्वर युवा मित्र मंडळ, करूळ भोयेडेवाडी यांच्याकडे राहील. स्पर्धा संपल्यानंतर सर्व ढोल पथकांनी सामुदायिक ढोल वादन करावे. अधिक माहितीसाठी संपर्क हिंदुराव पाटील- ८७६६४४१५८४, संतोष सावंत - ७९७७६४११४६, विजय चव्हाण - ९४२०२६२१७५, अनिल पाटील - ९४०४८६००७४, चंद्रकांत पाटील - ८७६७४५६६४६, हेमंत पाटील - ७५१७४४४००१, यांच्याशी संपर्क साधावा.