
वैभववाडी : खांबाळे येथील राज्यस्तरीय भजन स्पर्धेचा सिंधुदुर्ग जिल्हा भजन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बुवा भालचंद्र केळुसकर यांच्या हस्ते उदघाटन झाले. देवगड पोंभुर्ले येथील बुवा स्वप्नील मांडवकर यांच्या भजनाने स्पर्धेला शुभारंभ झाला.
खांबाळे गावची ग्रामदैवता श्री आदिष्टी देवीचा आज सप्ताह होत आहे. यानिमित्त राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेच आयोजन करण्यात आले. राज्यातील नामवंत १४ भजनी बुवा या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे मोठ्या दिमाखात उदघाटन झाले. यावेळी देवस्थानचे मानकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.