
दोडामार्ग : उसप गावचे मा. सरपंच धनंजय गवस यांचे हस्ते व चेअरमन प्रकाश स.गवस, चंद्रकांत मळीक, बाळा गवस (मा.उपसरपंच) वकिल दाजी नाईक यांच्या उपस्थितीत उसप धान्य दुकानावर आनंदाचा शिधा वाटप करण्यास आजपासुन सुरवात करण्यात आली.
दिवाळीचा सण हा सर्वांचा गोड जावा याकरिता महाराष्ट्र शासनाने धान्य दुकानावर केवळ १०० रु.त ४ वस्तू ( रवा १ किलो, साखर १ किलो, चणादाळ १ किलो, पामतेल १ लि. देण्यात येत आहे.
आज संध्या.५ वाजता उसप धान्यदुकानात हे किट पोचले. ताबडतोब याचे वितरण करण्यात आले. त्यावेळी विलास मोरजकर. प्रविण, गवस, भुपेश गवस, साईनाथ गवस, चंद्रकांत नाईक, संतोष रा. गवस, गोपाळ नाईक (बाबगो) आदी उपस्थित होते.