
देवगड : ग्रामीण रुग्णालय देवगड येथील प्रश्नावरून वारंवार वातावरण तापत असताना आता पुन्हा एकदा गणेश गावकर यांनी थेट या रुग्णलयातील प्रश्नावरून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या रुग्नालायातील डायलेसिस सेंटर तात्काळ सुरू करन्याची मागणी शिवसेना उबाठा गट युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.अन्यथा ग्रामीण रुग्णालयासमोर बसूनच आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटल्या प्रमाणे आपल्या देवगड ग्रामीण रूग्णालयामधील डायलेसीस सेंटर हे गेले कित्येक दिवस बंद असून सदर प्रकार गेल्या सहा महिन्यात दुसऱ्यांदा घडला आहे. त्यामुळे देवगड मधील डायलेसीसच्या पेशंटला प्रायव्हेट हॉस्पिटला जावे लागते. त्यामुळे डायलेसीसच्या रूग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. डायलेसीसची मशीन येत्या २ दिवसात चालू झाली नाही.तर आम्ही युवासेनेच्या वतीने ग्रामीण रूग्णालयासमोर बसून आंदोलन करण्यात येईल.असा इशारा शिवसेना(उबाठा गट)युवासेना देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी देवगड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक संजय विटकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.