
दोडामार्ग : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नेहमीच महिलांच्या हिताची जपणूक केली आहे. महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. तळकोकणातील महिलांच्या समस्या, प्रश्न पक्षाच्या माध्यमातून सोडवू त्यासाठी महिलांची शक्ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मागे उभी करा असे आवाहन कोकण विभाग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांनी केले आहे. दोडामार्ग तालुक्यातील कोलझर येथील महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आयोजित या महिला मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आगामी काळात विविध उपक्रमांची आखणी या निमित्ताने करण्यात आली.
रस्ते, पाणी, वीज आणि आरोग्य अशा विविध समस्या आज दोडामार्ग तालुक्याला भेडसावत आहेत. आपल्या महिला भगिनींना आरोग्य सुविधेसाठी पूर्णपणे गोवा राज्यावर अवलंबून राहावे लागत आहे. भविष्य काळामध्ये महिलांची या समस्येपासून मुक्तता करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वचनबद्ध आहे. असा विश्वास यावेळी बोलताना अर्चना घारे परत यांनी व्यक्त केला.
दोडामार्ग तालुक्यातील महिला भगिनी पूर्ण ताकतीनिशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागे उभ्या राहतील असा विश्वास मिळाव्याच्या आयोजक आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या नवनियुक्त सचिव रिद्धी मुंगी यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केला. यावेळी तालुका अध्यक्ष प्रदीप चांदलकर, महिला तालुकाध्यक्ष ममता नाईक, विनायक देसाई आणि उल्हास नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कोकण महिला अध्यक्ष अर्चना घारे - परब, राष्ट्रवादी युवती सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष सुनीता भाईप, दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, महिला तालुकाध्यक्ष ममता नाईक, उपाध्यक्ष प्रिया देसाई, युवक अध्यक्ष गौतम महाले, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, सदस्य लक्ष्मी बोंद्रे, वंदना पास्ते, समीक्षा बोंद्रे, तसेच , सुरेश नांगरे, विनायक देसाई, प्रमोद मळीक, सुखदा मुंगी, सुप्रिया बोंद्रे, अभिलाषा पास्ते, शामसुंदर मुंगी, महादेव देसाई यांसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरवी महाजन यानी केले.