
वैभववाडी : वैभववाडी शहरातील स्टॉलधारकांचे आम्ही स्वखर्चाने अस्थायी स्वरूपाचे पुनर्वसन करणार होतो.परंतु ठाकरे शिवसेनेचे मंगेश लोके यांनीच त्यात खोडा घातला.तहसिलदारांकडे तक्रार करून यांनीच काम थांबवले होते. त्यामुळे स्टॉलधारकांचे खरे वैरी मंगेश लोकेच आहेत अशी टिका नगरपंचायतीचे बांधकाम सभापती विवेक रावराणे यांनी केली आहे
दोन दिवसांपुर्वी श्री.लोके यांनी स्टॉलधारकांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी पोलीसांकडे केली होती.त्याला आज श्री.रावराणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.त्यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे नगरपंचायतीच्या कारवाईसंदर्भात मत व्यक्त करण्यापुर्वी घडलेल्या सर्व प्रकाराची सत्यता त्यांनी तपासायला हवी होती.त्यानंतर त्यांनी उबाठाच्या बिनकामी नगरसेवकाची पाठराखण करायला हवी होती.श्री.लोके हे स्टॉलधारकांची दिशाभुल करण्याचे काम करीत आहेत.स्टॉलधारकांचे आम्ही पाठीराखे आहोत असे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आम्ही या स्टॉलधारकांचे पुनर्वसन करण्याचे काम हाती घेतले होते.१ मे रोजी २०२३ रोजी आमदार नितेश राणेच्या हस्ते कामाचा शुभारंभ देखील केला. स्टॉलधारकांना आम्ही स्वखर्चाने त्यांचे अस्थायी पद्धतीने पुनर्वसन करणार होतो. त्यावेळी श्री.लोके यांनीच तहसिलदारांकडे तक्रार केली. त्याचे सर्व पुरावे आहेत. त्यावेळी लोके यांच्या वर्तमान पत्रात बातम्याही आल्या होत्या, यांचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यांच्या तक्रारीमुळेच हे काम थांबले.त्यामुळे खऱ्या अर्थाने स्टॉलधारकांचे वैरी हे मंगेश लोकेच असल्याची टिका श्री.रावराणे यांनी केली आहे.