एसटी कर्मचारी संपावर

काही गाड्या सुटत असल्याने गोंधळ
Edited by: ब्युरो
Published on: September 03, 2024 05:13 AM
views 310  views

सावंतवाडी : गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असतानाच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पूकारलाय // सावंतवाडीतील कर्मचाऱ्यांनी याला प्रतिसाद दिलाय // मात्र काही बसेस सुटत असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झालाय // वस्तीला गेलेल्या बसेस डेपोत आल्यात // मात्र लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या अद्यापही सुटलेल्या नाहीत // सावंतवाडी डेपो मॅनेजर यांना विचारलं असता आम्ही गाड्या सोडण्याचा प्रयत्न करतोय असं म्हटलंय // वार्षिक वेतनवाढ आणि इतर मागण्यांसाठी हा संप होतोय // दुपार नंतर संपात सहभागी झालेले कर्मचारी निर्णय घेणार आहेत // तर दुसरीकडे कणकवली आणि इतर डेपोच्या बसेस सुरु // आता हा संप कधी मिटतोय हे पाहावं लागेल //