LIVE UPDATES

एसटीची धडक ; युवतीच्या जबड्याला दुखापत

Edited by: विनायक गांवस
Published on: June 26, 2025 18:39 PM
views 561  views

सावंतवाडी : ओव्हरटेक करणाऱ्या एसटी बस चालकाने दुसऱ्या बसमधून उतरून रस्ता ओलांडणाऱ्या काॅलेज युवतीला धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली. हा अपघात सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास माडखोल वरची धवडकी येथे घडला. शर्वरी श्रीकृष्ण आरोंदेकर  वय 18 रा. देवसू .ख्रिश्चनवाडी असे युवतीचे नाव असून या प्रकरणी एसटी चालक सचिन आनंद कांबळे वय 42 रा. आजरा याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी शर्वरी आरोंदेकर युवती माडखोल येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. आज सकाळी ती पारपोली एसटी बसमधून माडखोल वरची धवडकी येथे उतरून ती एसटीच्या मागून रस्त्याच्या पलीकडे जात असताना कोल्हापूर सावंतवाडी मागून भरधाव वेगात येणाऱ्या बसने तीला धडक दिली‌. यामध्ये शर्वरीच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली.अपघातानंतर तेथील स्थानिक ग्रामस्थांनी तिला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान या अपघाताप्रकरणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार एसटी चालक सचिन आनंद कांबळे रा. आजरा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.