
देवगड : देवगड तालुक्यातील मोंड येथे अरुंद रस्त्यावर दोन एसटीं बस मध्ये समोरासमोर धडक बसून शालेय विद्यार्थ्यांना दुखापत झाल्याची घटना आज सायंकाळी ५ वा.च्या सुमारास घडला. या घटनेतील विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. देवगड तालुक्यातील मोंड हायस्कूलच्या जवळील एका अरुंद रस्त्यावर दोन एसटींची समोरासमोर धडक बसून घडलेल्या अपघातात एसटीतील काही शालेय विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. हा अपघात बुधवारी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास घडला.याच मार्गावरील एसटी अपघाताची ही तिसरी घटना असून.
येथील घटनास्थळावरून मिळालेल्यामाहितीप्रमाणे, देवगड एसटी आगाराची देवगड वानिवडे ही बसफेरी मोंड हायस्कूलमार्गे वानिवडेच्या दिशेने जात होती. सायंकाळी ५ वा. च्या सुमारास मोंड हायस्कूल नजीकच्या एका अरुंद उताराच्या रस्त्यावरील अवघड वळणावर ही बसफेरी आली असता समोरून आलेल्या विजयदुर्ग- वैभववाडी या बसफेरीची धडक देवगड- वानिवडे बसफेरीला बसली. या मार्गावरील अवघड वळणावर घडलेल्या या अपघातादरम्यान दोन्ही चालकांनी एसटी गाड्यांवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने अपघाताची भीषणता टळली.तरीही या धडकेत एसटींमधील काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली असून इतर प्रवाशांना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. दोन्ही एसटी गाड्यांच्या दर्शनी भागाचे किरकोळ नुकसान झाले. हा मार्ग अरुंद आहे.चढउताराचा आहे.तसेचरस्त्याच्याआजूबाजूला वाढलेल्या झाडांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघाताच्या घटना या ठिकाणी वारंवार घडत असून प्रशासनाने या कडे गांभीर्याने लक्ष्य देऊन योग्य ती दखल द्यावी अशी स्थानिक ग्रामस्थांन ची मागणी आहे.