एसएसपीएम मेडिकल कॉलेज - लाईफटाईम हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचा ट्रॅडिशनल डे उत्साहात

कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ
Edited by: भरत केसरकर
Published on: February 14, 2023 19:47 PM
views 368  views

कुडाळ : एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल व्यवस्थापन यांच्यामार्फत सर्व कर्मचाऱ्यांसाठी ट्रॅडिशनल डे चे आयोजन करण्यात आले होते.

प्रत्येक कर्मचाऱ्याला ऑर्गनाझेशनमध्ये काम करताना, काम करत असलेल्या ठिकाणचे वातावरण अतिशय महत्वपूर्ण असते. कामाच्या ठिकाणी सभोवतालचे वातावरण आनंदी असेल तर कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये अजून चांगले काम करण्याची आंतरिक आणि मानसिक क्षमता वाढण्यास मदत होते. तसेच मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल येथे नेहमीच कर्मचारी हिताचे निर्णय घेतले जातात. या अनुषंगाने आपल्या संस्थेतील प्रत्येक कर्मचारी आनंदी असेल तर आपण सिंधुदुर्गवासियांना अजून चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा देऊ शकतो. म्हणून एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल येथे कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना या ट्रॅडिशनल डे च्या निमित्ताने एक आनंदी वातावरण निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला गेला.