SSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्यावतीने प्रशिक्षण कार्यशाळा

Edited by:
Published on: December 21, 2024 19:16 PM
views 143  views

कणकवली : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवली येथे अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद ए.आय.सी.टी.ई., ट्रेनिंग अँड लर्निंग नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने, मेकॅनिकल विभागाद्वारे आयोजीत करण्यात आलेल्या १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर "Renewable Energy Resources: Current Status, Future Prospectus and Their Enabling Technology" यां साप्ताहिक प्रशिक्षण कार्यशाळेचा सांगता समारंभ २१ डिसेंबर रोजी करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे उद्घाटन हावेरी युनिव्हर्सिटी कर्नाटक यांचे कुलगुरू डॉक्टर सुरेश जंगम शेट्टी यांचे शुभहस्ते तसेच प्रिन्सिपल प्राध्यापक डॉक्टर दूरधुंडी सावंत बडकर समन्वयक, प्राध्यापक सचिन विलास वंजारी, विभाग प्रमुख, मेकॅनिकल डिपार्टमेंट, सहसमन्वयक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी एकूण 77 प्राध्यापकांनी नावनोंदणी केली होती. या कार्यक्रमासाठी ए.आय.सी.टी.ई., अटल अकॅडेमी यांच्या तर्फे रुपये तीन लाख पन्नास हजार अर्थसहाय्य करण्यात आले.

या कार्यक्रमांतर्गत पहिल्या दिवशी कुलगुरू डॉक्टर सुरेश जंगम शेट्टी, हावेरी युनिव्हर्सिटी कर्नाटक यांचे व्याख्यान झाले. तसेच दुपारी डॉक्टर जगन्नाथ हिरकुळे डीन, गोवा इंजिनिअरिंग कॉलेज, गोवा यांचे व्याख्यान झाले. दुसऱ्या दिवशी बसवेश्वर इंजिनिअरिंग कॉलेज बागलकोट, कर्नाटका येथील डॉक्टर संगमेश गौडपन्नावर, डॉक्टर बसनगौडा रोनाल्ड आणि डॉक्टर नाईक यांचे व्याख्यान झाले. तिसऱ्या दिवशी के. एल.ई. टेक्निकल युनिव्हर्सिटी हुबळी, कर्नाटका येथील डॉक्टर नागराज बदनापूरमठ आणि डॉक्टर के. एस. निवेदिता यांचे व्याख्यान झाले. चौथ्या दिवशी वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सांगली येथील डॉक्टर डी. एस. मोरे आणि डॉक्टर एस. एस. कार्वेकर यांचे व्याख्यान झाले. पाचव्या दिवशी एस. एस.पी.एम. कॉलेज कणकवलीचे प्राचार्य डॉक्टर डी. एस. बडकर यांचे व्याख्यान झाले. दुपारी औद्योगिक प्रशिक्षण निमित्त पवनचक्की प्रकल्प देवगड येथे सर्व सहभागी प्राध्यापकांची भेट सहल घडविण्यात आली. शेवटच्या दिवशी वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्राध्यापक डॉक्टर विजय मोहाले, यांचे व्याख्यान झाले. दुपारच्या सत्रात परीक्षा घेऊन प्रशिक्षण शिबिराची सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ओंकार साळवी यांनी केले. या प्रशिक्षण शिबिरात एम. आय.टी. एम. ओरोस, गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक मालवण, वाय.बी.आय.टी. सावंतवाडी, आर.एम.सी.ई.टी. देवरुख, भारती विद्यापीठ, मुंबई, एम.जी. एम. कॉलेज, मुंबई, व्ही. एस. एम. कॉलेज, निपाणी, डी. के. आय.टी. इचलकरंजी अशा अनेक कॉलेजमधून आलेल्या प्रशिक्षणार्थी प्राध्यापकांनी शिबिरात सहभाग घेतला.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक खासदार नारायण राणे, संस्थेच्या अध्यक्ष सौ निलम राणे,  उपाध्यक्ष निलेश राणे, सचिव आमदार नितेश राणे यांनी प्रोत्साहन व शुभेच्छा दिल्या. प्रिन्सिपल प्राध्यापक डॉक्टर दूरधुंडी सावंत बडकर, समन्वयक आणि प्राध्यापक सचिन विलास वंजारी, विभाग प्रमुख, मेकॅनिकल डिपार्टमेंट सहसमन्त्रयक आणि सर्व विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी वृन्द्रांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला.