
सावंतवाडी : विद्या विहार इंग्लिश स्कूल आरोस हायस्कूलचा 100 टक्के निकाल लागलाय. 100 टक्के निकालाची ही परंपरा कायम ठेवलीय. प्रशालेतून धनश्री मोरजकर 89 टक्के गुण मिळवत प्रथम आलीय. तर मयुरी आरोसकर 87.80 टक्के गुण मिळवत द्वितीय तर हर्षदा नाईक 81.80 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केलाय.
विद्या विहार इंग्लिश स्कूलने 100 टक्के निकालात सातत्य राखलंय. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, वर्गशिक्षक अनुष्का गावडे, संस्थेचे अध्यक्ष निलेश परब, उपाध्यक्ष महादेव पांगम, सेक्रेटरी शांताराम गावडे, संचालक आणि सहाय्यकशिक्षक यांनी अभिनंदन केलय.