कमी श्रमात, कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी श्री पद्धतीने भातशेती हाच उत्तम मार्ग

तज्ञ मार्गदर्शक हनुमंत गवस यांनी दिला कानमंत्र | झरेबांबर येथे दोडामार्ग तालुका कृषी मेळावा संपन्न
Edited by:
Published on: July 01, 2023 15:30 PM
views 193  views

दोडामार्ग : कमी श्रमात आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी श्री पद्धतीने भातशेती करणे हा  उत्तम मार्ग असल्याचा कानमंत्र तज्ञ मार्गदर्शक हनुमंत गवस यांनी कृषिदिनी दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना दिला.

झरेबांबर येथे आशिर्वाद सभागृहात तालुका कृषी मेळावा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते, त्यांचे समवेत व्यासपीठावर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बेहेरे, आत्मा कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रेमानंद देसाई, प्रगतशील शेतकरी अनिल मोरजकर, झरेबांबर सरपंच अनिल शेटकर, पिकूळे सरपंच आपा गवस, तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर, सहा. गटविकास अधिकारी  निलेश यादव, कृषी तज्ञ चंद्रशेखर सावंत कृषी विस्तार अधिकारी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वृक्ष लागवड करून म.गां. राष्ट्रीय रोजगार हमी योजना शुभारंभ करण्यात आला. मयनावरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे प्रतिमा पूजन करून कृषी मेळाव्याची सुरवात करण्यात आली.  निलेश जाधव यांनी प्रस्तावना केली. 

त्यांनतर . प्रगतशील शेतकरी मार्गदर्शन अनिल उर्फ कृष्णा मोरजकर यांनी सेंद्रिय शेती बाबत तर   हनुमंत गवस यांनी पाणलोट व SRI भात लागवड , चंद्रशेखर सावंत यांनी  काळानुसार शेतीतील बदल,प्रेमानंद फ. देसाई यांनी शेती पूरक व्यवसाय या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

बळीराजा सन्मान

तालुक्यात कृषिक्षेत्राला नवसंजवनी देण्यासाठी शेतीत विशेष योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचे सन्मान या मेलव्यात झाले. त्यात प्रेमानंद फ. देसाई, केर, सरिता पांडुरंग मोरजकर रा. बोडदे, नारायण आत्माराम शिधये रा. वझरे,  अनिता अनंत सावंत रा. तळेखोल, नारायण मनोहर गवस रा. पिकुळे, प्रेमनाथ सखाराम कदम रा. घोडगेवाडी,  विनय भगवान दळवी रा. घोडगे या शेतकऱ्यांचा समावेश होता.

ग्रामसेवक सन्मान

ग्राम स्तरावर विविध योजना व उपक्रम प्रभावीपणे राबविणाऱ्या ग्रामसेवक यांचाही सन्मान झाला. त्यात  म.गां. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना श्रीम. ज्योती ज. डोंगरदिवे ग्रा.वि. अ. साटेली भेडशी,   श्रीम. शिल्पा वि. रेडकर ग्रा. से. माटणे श्रीम. सोनिया सि. नाईक ग्रा. से. घोडगेवाडी यांचा तर  नवीन राष्ट्रीय बायोगॅस विकास व खत व्यवस्थापन योजना अमीत ना. दळवी,  तेरवण मेढे, संदिप भ. पाटील आ. हेवाळे, श्रीम. सोनिया सि. नाईक प्रा. से. मो यांचा सन्मान झाला.


तालुका कृषी अधिकारी दोडामार्ग प्रमोद बनकर, गटविकास अधिकारी मनोजकुमार यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाने मेळाव्याची सांगता झाली. आभार सरपंच अनिल द. शेटकर यांनी मानले.


सुंदर गाव स्पर्धेत झोळंबे अव्वल


आर. आर. (आबा) सुंदर गाव स्पर्धा २०२०/२१ मध्ये तालुक्यात यश संपादन करणाऱ्या झोळंबे गावच्या सरपंच व ग्रामपंचायत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


२. कृषी मिळालेल्या उपस्थित शेतकरी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व अधिकारी.