साटेलीत 'सत्संग आनंद' सोहळा !

Edited by: संदीप देसाई
Published on: May 09, 2024 12:04 PM
views 193  views

दोडामार्ग : श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ ( कोल्हापूर ) व काडसिद्धेश्वर सांप्रदाय मंडळ, दोडामार्ग यांच्या मार्फत अध्यात्मिक सत्संग आनंद सोहळा शनिवार दिनांक 11 मे रोजी सायंकाळी ६ ते ९ दरम्यान होणार आहे. हा कार्यक्रम साटेली ग्रामपंचायतच्या पटांगणावर होणार आहे.

या कार्यक्रमानिमित्त सकाळी ५.३० वा. काकड आरती, सकाळी ९ वाजता सांप्रदायिक भजन, सायंकाळी ५ वाजता महाराजांचे आगमन,  सायंकाळी ६ वाजता सांप्रदायिक भजन, सायंकाळी ६.३० वाजता स्वामी महाराजांचे दर्शन, सायंकाळी ७.१५ वाजता स्वामी महाराजांचे प्रवचन, रात्रौ ८.३० वाजता दर्शन आरती व सर्वांसाठी महाप्रसाद असणार आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन काडसिद्धेश्वर सांप्रदाय मंडळ, दोडामार्ग यांनी केले आहे.