श्री देवी शांतादुर्गा ग्रामविकास पॅनलची उसपमध्ये प्रचारात जोरदार मुसंडी

विजय आमचाच पक्का : माजी उपपसभापती लक्ष्मण उर्फ बाळा नाईक व विद्यमान सरपंच दिनेश नाईक यांना विश्वास
Edited by: संदीप देसाई
Published on: December 11, 2022 19:33 PM
views 499  views

दोडामार्ग : ग्रामसमृध्दी हेच लक्ष ठेवून उसप ग्रामपंचायतीच्या होवू घातलेल्या सार्वत्रिक निवडणूकीत गावच्या सर्वागीण विकासाकरीता तसेच उस गावचे श्रध्दास्थान कै. शंकरराव देसाई यांच्या कारकिर्दीत चालणारे आदर्शवत उसप गाव आपल्याला पुन्हा निर्माण करायचं आहे. त्यासाठी श्री देवी शांतादुर्गा ग्रामविकास पॅनलचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांना भरभरून साथ द्या आणि विकासाला मत दया अशी हाक देत पंचायत समितीचे माजी उपपसभापती लक्ष्मण उर्फ बाळा नाईक व विद्यमान सरपंच दिनेश नाईक यांच्या श्री देवी शांतादुर्गा ग्रामविकास पॅनलने उसप गावच्या ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे.


 

    आपले गाव स्वच्छ सुंदर निसर्ग संपन्न आणि विकसित असायला हवे. ग्रामस्थांना अपेक्षित विकासकामे मार्गी लावून ग्रामपंचायतीने गावाला आदर्श गाव बनविले पाहीजे. त्यासाठी गावाशी नाळ जोडून असलेल्या प्रत्येक युवकाचे, जेष्ठाचे योगदान गरजेचे असून उसप गावातील ग्रामस्थांच्या मुबलक पाणी, रस्ते व वीज अशा मुलभूत गरजांकडे आमचे प्रथम प्राधान्याने लक्ष राहील. सर्व सामान्य लोकांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावविकासाच्या प्रवाहात सामावून घेण्यावर आमचा भर रहाणार असून सर्वात महत्वाच म्हणजे  गावची शांतता व एकोपा याकडे आमचा विशेष कल राहणार आहे, असा अजेंठा श्री देवी शांतादुर्गा ग्रामविकास पॅनलने जनतेसमोर ठेवला आहे. या पॅनलने आपल्या जाहीरनाम्यात १. गावातील जेष्ठ तरुण चाकरमानी यांना एकत्र घेवून गावातील बाद तंटे पूर्णतः सामोपचाराने मिटवून गाव सुखी समृध्दी एकोप्यान नांदवून आदर्श गाव बनवण्यासाठी प्रयत्न. (२) उसप पंचक्रोशीला कालव्याने पाणी आणण्यासाठी प्रयत्न (३) दूसगीवाडी येथील मुख्य रस्त्यावरील पुल बांधणी. (४) उसप गावातील संपूर्ण पांनंदी लोकसहयोगातून खुल्या करून कॉक्रीटीकरण (५) स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता करणे. ६) ग्रामपंचायत मालकीच्या जागेत उदयान, जलतरण (स्विमिंगपूल) व्यायामशाळा, वाचनालय उभारणे, (७) वाडीवाडीवर नळ योजना अधिक प्रभावीपणे राबवून मोफत पाणीपट्टी आकारणीसाठी सौरउर्जेवर नळयोजना सुरू करणे .

८) बोकर वाडी पर्यटन स्थळ दृष्टया विकसित करणे. ९) गावाच्या मुख्य प्रवेश द्वारावर स्वागत कमान बांधणे. (१०) शांतादुर्गा देवालय परीसर सुशोभीकरण करणे. (फूटपाथकरण, विदयुत रोषणाई. सुसज्य बैठक व्यवस्था आणि सभामंडप ) ११) धुरीवाडी ते कर्येवाडी रस्ता व पूल पूर्ण करणार. (१२) उसप गावासाठी मोफत अॅम्बुलन्स १३) लघु- सुक्ष्म उदयोगांना प्रोत्साहन देऊन महीला सक्षमीकरण (१४) उसप बोकारवाडी उर्वरीत पायवाट कॉक्रीटीकरण करणार. (१५) उसप ते बोकारवाडी रस्ता पूर्ण करणार, १६) गावातील जुन्या विहिरी नुतनीकरण करणार. (१७) धुरीवाडी नवीन नळयोजना, स्मशानशेड बांधणारच (१८) उसप मुख्य रस्ता डांबरीकरण करणार. वरील विकासकामे जाहीरनाम्यात मांडताना आमचा संघर्ष हा सत्ता आणि संपत्तीसाठी नसून गावाच्या संपूर्ण विकासासाठी आहे असेही म्हटले आहे.

तर मागील दहा वर्षात उसप गावासाठी विकासाच्या नवनवीन संकल्पना राबविताना माजी उपसभापती लक्ष्मण उर्फ बाळा नाईक व सरपंच दिनेश नाईक यांच्या माध्यमातून गावात अनेक विकासकामे करण्यात आल्याने जनता आम्हालाच साथ देईल असा विश्वास श्री देवी शांतादुर्गा ग्रामविकास पॅनलने व्यक्त केला आहे.


बॉक्स

श्री देवी शांतादुर्गा ग्रामविकास पॅनलचे थेट सरपंच पदाच्या उमेदवार-सौ. शुभदा भगवान गवस


*प्रभाग - १ चे उमेदवार

कु. अक्षता अशोक गवस

सौ. प्राजक्ता प्रज्योत गवस

श्री. संतोष रामा जाधव


प्रभाग - २ चे उमेदवार

श्री. अशोक सखाराम नाईक

सौ. दिया देविदास गवस


प्रभाग - ३ चे उमेदवार

श्री. दिनेश अनंत नाईक

सौ. वनिता वामन देसाई