खेळाडूंनी खेळाकडे करिअर म्हणून पहावे : जयेंद्र रावराणे

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा आयोजित शालेय तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा वैभववाडीत संपन्न
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 04, 2023 22:04 PM
views 139  views

वैभववाडी : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून खेळाची आवड जपली पाहिजे.खेळाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडू शकते.खेळाकडे करिअर म्हणून बघायला हवे. त्यातूनच देशासाठी खेळाडू घडू शकतील असं मत माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी व्यक्त केले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.याच उद्घाटन  जयेंद्र रावराणे  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रावराणे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

तालुक्यातील विविध शाळांमधील संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी  नायब तहसीलदार  श्री.पाटील  , मुख्याध्यापक बी.एस.नादकर, तालुका  क्रीडा समन्वयक श्री. घावरे , श्री.फाळके ,वैभववाडी विषय शिक्षक गटसाधन केंद्राचे श्री.तापेकर , श्री.पंढरे   तसेच तालुक्यातील क्रीडा शिक्षक ,संघ व्यवस्थापक, पंच ,पालक व खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार क्रिडा शिक्षक एस.टी. तुळसणकर यांनी केले.