बाल शिवाजी इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात

Edited by: उमेश बुचडे
Published on: December 11, 2023 12:08 PM
views 50  views

कणकवली : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक आठ डिसेंबर व नऊ डिसेंबर या दिवशी शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धा मध्ये शाळेतील पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा विविध खेळांमध्ये सहभाग होता . यावेळी मुलांनी कबड्डी, खो-खो, कॅरम ,बुद्धिबळ रस्सीखेच यासारख्या विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

स्पधेचे उद्घाटनविद्यामंदिर येथील क्रीडा शिक्षक अच्युतराव वणवे यांच्या हस्ते करण्यात आले . सर्व स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी  संस्थेच्या सचिव सुलेखा राणे , तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका गीतांजली कुलकर्णी  संस्था सदस्य संदीप सावंत सर व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही अनमोल असे मार्गदर्शन मिळाले.