वेंगुर्ल्यात दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेगा ऑर्थोपेडीक कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

१५० पेक्षा जास्त रुग्णांनी घेतला शिबीराचा लाभ
Edited by: दिपेश परब
Published on: July 19, 2023 20:09 PM
views 148  views

वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना, सावंतवाडी मतदारसंघ व दिपकभाई केसरकर मित्र मंडळ यांच्यावतीने लोकमान्य हॉस्पीटल पुणे यांच्या सौजन्याने आयोजित मोफत वेंगुर्ल्यात मेगा आर्थोपेडीक कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी १५० पेक्षा जास्त रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना, सावंतवाडी मतदारसंघ, दिपकभाई केसरकर मित्र मंडळ व वेंगुर्ला तालुका शिवसेना यांच्यावतीने लोकमान्य हॉस्पीटल पुणे यांच्या सौजन्याने वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या मेगा आर्थोपेडीक कॅम्पचे उद्घाटन वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या हस्ते करण्यात आले. तर यावेळी सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे व डॉ योगेश नावांगुळ यांच्या हस्ते दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. यावेळी वेंगुर्ले शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शिवसेना जिल्हा संघटक सुनील डुबळे, तालुका समन्वयक बाळा दळवी, युवासेना शहर प्रमुख संतोष परब, मच्छिमारसेल तालुकाप्रमुख गणपत केळुसकर, प्रवक्ते सुशील चमणकर, होडावडा शाखाप्रमुख परेश मुळीक, महिला विभाग संघटक सावली आडारकर, प्रकाश मोटे, पाल शाखाप्रमुख सुरेंद्र वारंग, उभादांडा उपशाखाप्रमुख शिवाजी पडवळ, आडेली ग्रामपंचायत सदस्य सुधीर धुरी, मातोंड- पेंडुर सामाजिक कार्यकर्ते देवा कांबळी, पेंडूर ग्रा प सदस्य निलेश वैद्य आदी यांच्या सहित शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी पुणे येथील टीमच्या डॉ. अश्विन मडावी, डॉ प्रसाद भिम्बरवाड, कौन्सेलर सचिन पवार, राज सावंत, चेतन काळे, एक्स रे साठी सुदर्शन सुतार आदींनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिराचा १५० पेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतला.