
वेंगुर्ला : जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उभादांडा मित्र मंडळ, रोझारी युथ ग्रूप व कार्मिस आल्मेडा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सचिन वालावलकर यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त ५० रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच निलेश चमणकर, उमेश वाळवेकर, उपसरपंच टीना आल्मेडा, ग्रामपंचायत सदस्य राधाकृष्ण पेडणेकर, गणेश चेंदवणकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. परुळेकर, रमेश नरसुले, कार्मिस आल्मेडा, महेंद्र मोचेमाडकर, शैलेश नार्वेकर, सुजित चमणकर, एलवीस आल्मेडा, यशवंत किनळेकर आदी उपस्थित होते. यावेळी माजी सभापती यशवंत परब, जयप्रकाश चमणकर यांनी या शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्मिस आल्मेडा यांच्या पुढाकाराने हे १९ वे रक्तदान शिबिर संपन्न झाले.