
देवगड : देवगड मधील ५३ व्या विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिक्षण विकास मंडळाचे एन. एस. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय आणि शिक्षण विभाग,पंचायत समिती देवगड यांच्या संयुक्त विद्यमानाने ५३ वे विज्ञान प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती देवगडचे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे यांच्या प्रास्ताविकाने झाले. त्यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले कि, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अशा प्रदर्शनांचे महत्त्व आहे. त्याचबरोबर येथील गुणवंत विद्यार्थी जिल्हा व राज्य स्तरावर विज्ञान प्रदर्शनासाठी पात्र ठरत असतात.त्यामुळे हे एक आपल्यातील कौशल्याला पुढे नेण्यासाठीचे व्यासपीठ आहे.
कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पारस जाधव यांनी विद्यार्थ्यांना संशोधन प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करताना निरीक्षण क्षमता,तर्कशुद्ध विचार,नवे प्रयोग आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये यांचे महत्त्व स्पष्ट केले. “विज्ञान हे भविष्य घडविण्याचे साधन आहे.जिज्ञासू रहा आणि सतत प्रयोग करत राहा,” असा संदेश त्यांनी दिला. शिक्षण विकास मंडळाचे सभापती . एकनाथ तेली यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “विज्ञानाचे सखोल ज्ञान हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मानवासाठी उपयोगी पडतील असे शोध लावण्याचे ध्येय विद्यार्थी वर्गाने ठेवावे,” असे ते म्हणाले.
या विज्ञान प्रदर्शना बरोबर इतरही स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या होत्या. या सर्व स्पर्धांमध्ये ६६ शाळेतील जवळ जवळ ३६० मुले व मार्गदर्शक शिक्षक सहभागी झाले होते. या सर्व स्पर्धांचे योग्य परीक्षण करून निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये विद्यार्थी प्रतिकृती (माध्यमिक गट) प्रथम क्रमांक – कु. जयेश पांडुरंग डगरे,कु. अथर्व पराडकर,शाळा – शेठ म. ग. हायस्कूल देवगड,प्रतिकृतीचे नाव – कचऱ्यापासून वीज निर्मिती, द्वितीय क्रमांक – कु. शिवम हरिश्चंद्र वाडेकर,शाळा – शिरगाव हायस्कूल शिरगाव, प्रतिकृतीचे नाव- Ethena Tester, तृतीय क्रमांक – कु. शुभम सत्यवान टाकळे, शाळा – न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय देवगड, प्रतिकृतीचे नाव – 3D co-ordinate system दिव्यांग विद्यार्थी प्रतिकृती (माध्यमिक गट), प्रथम क्रमांक – कु. चैतन्य अनय गिरकरशाळा -पेंढारी पंचक्रोशी माध्य.विद्यालय पेंढारी. प्रतिकृतीचे नाव- दिव्यांगाची कुऱ्हाड विद्यार्थी प्रतिकृती (प्राथमिक गट) प्रथम क्रमांक – कु. ध्रुव योगेश गोलम प्रतिकृतीचे नाव- Waste managment and electricity Generationशाळा – उमा मिलिंद पवार हायस्कूल, देवगड. द्वितीय क्रमांक – कु. पूर्वा कोळसुमकर कु.आर्या तिर्लोटकर प्रतिकृतीचे नाव पाणी आलार्म शाळा पेंढारी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयतृतीय क्रमांक – कु. यश वैभव घाडी प्रतिकृतीचे नाव – व्ह्याक्यूम क्लीनर जि. प. पू. प्रा. शाळा पेंढरी वक्तृत्व स्पर्धा (प्राथमिक गट)प्रथम क्रमाकः – कु दिया संदीप साटम शाळा – उमा मिलिंद पवार हायस्कूल देवगड द्वितीय क्रमांक – कु. प्रतिमा प्रमोद मिठबावकर शाळा श्री नवलादेवी माध्य. विद्या सौंदाळे तृतीय क्रमांक – कु. श्रीमा मुकुल प्रभुदेसाई शाळा – शेठ म. ग. हायस्कूल देवगडवक्तृत्व स्पर्धा (माध्यमिक गट)प्रथम क्रमाक – कु स्नेहा महादेव नागरगोजेशाळा – शेठ म. ग. हायस्कूल देवगड द्वितीय क्रमांक – कु. शर्वरी संजय तायडे शाळा – उमा मिलिंद पवार हायस्कूल देवगडbतृतीय क्रमांक – कु. ऋषाली धनंजय कुळये शाळा – महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार निबंध स्पर्धा (प्राथमिक गट) प्रथम क्रमाक – कु. सुयश सुदेश गोलतकर,शाळा – शेठ म. ग. हायस्कूल, देवगड द्वितीय क्रमांक – कु. काव्या सुनील पवार शाळा – तोरसोळे नं. १ तृतीय क्रमांक – कु. धृवी मंगेश हिर्लेकर शाळा – हिंदळे भंडारवाडानिबंध स्पर्धा (माध्यमिक गट) प्रथम क्रमाक – कु दिक्षा विवेक मेस्त्रीशाळा – शेठ म. ग. हायस्कूल, देवगड द्विनीय क्रमांक – कु. सिद्धी मनेश वारीक शाळा – श्रीराम माध्य. विद्यामंदिर पडेल तृतीय क्रमांक – कु. लोचनी सखाराम गिरकर शाळा – शिरगाव हायस्कूल, शिरगाव प्रश्नमंजुषा स्पर्धा (प्राथमिक गट) प्रथम क्रमांक – कु. माही सदानंद कामतेकर कु. दुर्वास प्रकाश राणे शाळा -जि. प. शाळा सौंदाळे बाऊळवाडी द्वितीय क्रमांक – कु. शमिका जयवंत माळगवे कु.वेद राजेंद्र जोशी शाळा – श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेलतृतीय क्रमांक – कु. आर्यन मंगेश राणेकु. पूर्वा गजानन राणेशाळा – जि. प. केंद्रशाळा हिंदळे नं १प्रश्नमंजुषा स्पर्धा (माध्यमिक गट)प्रथम क्रमाक – कु. दिक्षिता सुहास हरम आर्य अजित जाधव शाळा – उमा मिलिंद पवार हायस्कूल देवगड द्वितीय क्रमांक – कु. राज्ञी विवेक कुलकर्णी,प्राजक्ता केदार भिडे शाळा – शेठ.म.ग. हायस्कूल, देवगड तृतीय क्रमांकः- कु. सई प्रकाश राणे कु. श्रेया अजय कणेरे शाळा श्री. नवलादेवी माध्य. विद्यामंदिर सौंदाळे शैक्षणिक साहित्य निर्मिती (प्राथमिक शिक्षक)प्रथम क्रमांक – संतोष दत्तात्रय राणे शाळा जि.प.पू.प्रा.शाळा पेंढरी द्वितीय क्रमांक – योगेश बाळासाहेब बांदल शाळा – जि.प.शाळा हिंदळे भंडारावाडा तृतीय क्रमांक – सदगुरू ज्ञानेश्वर तळेकर शाळा – जि.प. शाळा, गवाणे शैक्षणिक साहित्य निर्मिती (माध्यमिक शिक्षक) प्रथम क्रमांक – एम बी परचंडे. शाळा – विजयदुर्ग हायस्कूल द्वितीय क्रमांक संतोष बा.साटम शाळा – माध्यमिक विद्यामंदिर कुवळे तृतीय क्रमांक – भूषण दत्तात्रय दातार शाळा – अ. कृ. केळकर हायस्कूल वाडा प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर प्रथम क्रमांक –संतोष कुणाजी तिर्लोटकरशाळा – पेंढरी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय पेंढरी या सर्वांना पंचायत समिती देवगड विस्तार अधिकारी श्रीरंग काळे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
तसेच या सर्व कार्यक्रमाला शिक्षण विकास मंडळ. उपाध्यक्ष चंद्र हास मर्गज सहकार्यवाह . तुकाराम तेली .सभापती . एकनाथ तेली . प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, उपप्राचार्य डॉ. पारस जाधव, पर्यवेक्षक . मिलिंद भिडे, . सतीश कुमार कर्ले अध्यक्ष तालुका विज्ञान मंडळ देवगड, सत्यपाल लाडगांवकर जिल्हा विज्ञान संघटक संचालक जिल्हा माध्यमिक पतपेढी, केंद्रप्रमुख जोशी, जाधव, दहिफळे, सारंग उपस्थित होते. माजी मुख्याध्यापक एन. आर. माने, दीक्षित मॅडम, तसेच प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्ष उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत तसेच महाविद्यालयाने पुरवलेल्या सोयीसुविधांबाबत महाविद्यालयाचे विशेष कौतुक केले.हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालायचे सर्व शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले होते.










