ठाकरे शिवसेना आयोजित रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद | उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 26, 2023 20:02 PM
views 87  views

वैभववाडी : वैभववाडी शिवसेना व युवासेना यांच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.तालुक्यातील ४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.या रक्तदात्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी शिवसेनेच्यावतीने २६ आणि २७ जुलैला विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.आज दि.२६ जुलै  रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. रक्तदान शिबिरासाठी ४७ रक्तदात्यांनी रक्तदान केलं.या शिबिराचा शुभारंभ युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप  प्रज्वलन करून झाले.यावेळी  जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर, मुंबईचे माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक  -हेमंत बावधनकर, माजी जिल्हा  बँक संचालक दिगंबर पाटील, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे , तालुकाप्रमुख मंगेश लोके, युवासेना जिल्हाचिटणीस स्वप्निल धुरी, विभाग प्रमुख जितेंद्र तळेकर ,युवा सेना विभाग प्रमुख रोहित पावस्कर ,वैभववाडी शहर प्रमुख शिवाजी राणे,उपशहर प्रमुख सुनील रावराणे, नगरसेवक मनोज सावंत,उपविभाग प्रमुख- यशवंत गवाणकर, लोरे सरपंच विलास नावळे,राजेश तावडे, बबन धुरी, विलास पावसकर यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते  उपस्थित होते.