
1501 सूर्यनमस्कारांचा अभिषेक
वेंगुर्ला : विश्व हिंदु परिषद बजरंग दल वेंगुर्ला आयोजित हनुमान जन्मोत्सवा निमित्त मारती स्वारीना 1501 सूर्यनमसकारांचा अभिषेक घालण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती बजरंग दल जिल्हा संयोजक श्री कृष्णाजी धुळपणावर , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, रोहन धुरी, नित्यानंद आठलेकर, आशिष पाडगावकर आदी हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमात 15 बजरंगीनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ऋग्वेद आरोलकर तसेच मयुरेश पेडणेकर यांनी आभार मानले.











