
दोडामार्ग : दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाची दिवसेंदिवस बिकट अवस्था बनत चालली आहे. मनमानी कारभारामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होते. सोनोग्राफी तज्ञ आज गुरुवारी उपलब्ध नसल्याने गरोदर महिलांना तात्कळत बसावे लागले. या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी रुग्णालयात धडक देत शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांना फोन करून फैलावर घेतले. यावेळी सोनोग्राफी तज्ञांना पाटील यांनी फोन करुन रुग्णालयात हजर राहणायाचे आदेश दिले. यापुढे अशी चूक आम्ही सहन करणार नाही असा इशारा धुरी यांनी दिला.
यावेळी बोलताना धुरी म्हणाले की ग्रामीण रुग्णालंय दोडामार्ग येथे आधीच आरोग्य यंत्रणा कुचकामी झाली आहे. गरोदर मातांना दर गुरुवारी सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून दिली जाते. मात्र आज ९ एप्रिलला सोनोग्राफी तज्ञ रुग्णालयात उपस्थित नसल्याने अनेक मातांना तात्कळत बसावे लागले होते. ही बाब समजल्यानंतर लगेच मी रुग्णालयात गेलो. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांना फोन करून व सर्व बाब सांगून जाब विचारला. यावेळी पाटील यांनी तात्काळ सोनोग्राफी तज्ञांना रुग्णालयात हजर राहण्यास सांगितले. मात्र, अशा प्रकारे आरोग्याच्या बाबतीत हयगय आम्ही खपवून घेणार नाही असं धुरींनी सांगितल.











