तिलारीत पर्यटकांच्या कारला अपघात

Edited by: लवू परब
Published on: April 09, 2026 13:30 PM
views 22  views

दोडामार्ग : तिलारी येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास पर्यटकांच्या मर्सिडीज कारचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंड येथील काही पर्यटक दोडामार्ग मार्गे गोव्याला जात होते.  बुधवार सायंकाळच्या सुमारास तिलारी येथील हनुमान मंदिर जवळ ही गाडी आली असता नव्याने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा अंदाज न आल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला कलंडली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते महेश चिरमुरे, उदय जाधव, संतोष काळकुंद्रीकर, सुभाष दळवी, प्रशांत दळवी, सचिन लोंढे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चालक व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.  क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त गाडी बाहेर काढण्यात आली.