
सावंतवाडी : नाटककार तथा कवी स्व. सिद्धार्थ विष्णू तांबे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'पहिले आंबेडकर चौक साहित्य संमेलन – सावंतवाडी २०२६' आयोजित करण्यात आले असून, या साहित्य सोहळ्याचे आयोजन रविवार, १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कणकवली येथील ज्येष्ठ कवी व स्तंभलेखक अजय कांडर हे विराजमान होणार आहेत. उद्घाटक म्हणून सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड.अनिल निरवडेकर उपस्थित राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी वीरधवल परब यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते प्रा. एस. एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
संमेलनात नाटककार सिद्धार्थ विष्णू तांबे लेखन पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच कार्यकर्ता पुरस्कार ज्येष्ठ सांस्कृतिक कार्यकर्ते अनिल जाधव यांना देण्यात येणार आहे. यावेळी दोन पुस्तकांचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. कवी वीरधवल परब यांच्या हस्ते “रामपुराण” (कवी हरिश्चंद्र भिसे) या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार असून, ज्येष्ठ लेखिका संध्या तांबे यांच्या हस्ते लेखक समीर वेंगुर्लेकर यांच्या “वासरदार” या कादंबरीचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
संमेलनाचा एक विशेष आकर्षण म्हणजे निमंत्रितांचे भव्य कविसंमेलन होय. या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी अरुण नाईक असणार असून, विविध क्षेत्रातील अनेक कवी-लेखक सहभागी होणार आहेत. प्रा. डॉ. शरयू आसोलकर, प्रा. मोहन कुंभार, दीपक पटेकर, प्रतिमा तांबे, कल्पना बांदेकर, शैलजा परब, नीलम यादव, आर्या बागवे, मनीषा पाटील, प्रा. सुजिता गायकवाड, ऋतुजा सावंत भोसले, प्रज्ञा मातोंडकर, शालिनी मोहोळे, नितीन गवसकर, अँड. सुधीर गोळणकर, सत्यवान साटम, स्नेहल फणसळकर, मनोहर परब, किशोर वालावलकर, प्रकाश तेंडुलकर, प्रा. रूपेश पाटील, संतोष वालावलकर, राजेश कदम, मनीषा जाधव, एकनाथ कांबळे, राजा ठाकूर, नंदा चव्हाण, हरिश्चंद्र भिसे, रामचंद्र शिरोडकर, सुरेश पवार, मनोहर सरमळकर, मधुकर जाधव, प्रांजली पाटोळे, अनुष्का रेणवकर, योगिता शेटकर, किशोर कदम, प्रा. दर्शना पाटोळे, संध्या चव्हाण, संतोष तुळसणकर, रीमा भोसले, प्रियदर्शिनी पारकर, आर्य कदम, दीपक तलवडेकर, सायली नारकर, मालिनी ताड, अक्षदा गावडे, सेलेस्टीन शिरोडकर, नैतिक मोरजकर आदी मान्यवरांचा सहभाग असणार आहे. या संमेलनाचे प्रमुख संयोजक म्हणून मधुकर मातोंडकर व कवि विठ्ठल कदम कार्यरत आहेत. साहित्यप्रेमींनी या बहारदार साहित्य मेळाव्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे











