
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांच्यावतीने दिव्यांग बांधवांसाठी आयोजित विशेष तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये एकूण १९४ जणांनी सहभाग घेतला. विविध तपासण्यांचा लाभ यात घेतला गेला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसबीसी ब्रँच मॅनेजर श्री.जाधव होते. यावेळी माऊली कर्णबधिर विद्यालय व माऊली मतिमंद विद्यालय, शिरोडा यांच्या संस्थाचालक रेखा गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नायब तहसीलदार अपर्णा गावडे यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमास लाभले. तसेच दिव्यांग सेना सिंधुदुर्गचे अध्यक्ष संजय देसाई यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.
या शिबिरासाठी अस्थिरोग तज्ञ डॉ. निखिल अवधूत, नेत्र शल्यचिकित्सक डॉ. बाबासाहेब जोशी, कान-नाक-घसा तज्ञ डॉ. राम राणे, मनोपचार तज्ञ डॉ. रेश्मा भाईप, वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता टिपरे, फिजिओथेरपिस्ट डाॅ. योगिता शिंदे, डाॅ. स्पीच थेरपिस्ट श्रीधर पवार आदींसह वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव, रुपा मुद्राळे आदी उपस्थित होते.










