RPD त जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by:
Published on: December 14, 2023 10:59 AM
views 55  views

सावंतवाडी : भाईसाहेब सावंत जन्मशताब्दी वर्षानिमित्त राणीपार्वती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडीत  इथं 9 डिसेंबरला जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकासभाई सावंत यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर खजिनदार सी. एल. नाईक सर, स्कूल कमिटीचे अध्यक्ष नागवेकर, संस्था सदस्य अमोल सावंत,  श्रीमती सावंत मॅडम,  काॅलेजचे मुख्याध्यापक धोंड सर,  उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक मॅडम उपस्थित होते.

यावेळी सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा देताना संस्थेचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांनी यश अपयश न पाहता सतत आपल्या ज्ञानात भर पाडली पाहिजे असे मार्गदर्शन केले. तर मुख्याध्यापकांनी ही उपस्थित स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वनवे सर यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. कासार यांनी केले.

यांमध्ये दोडामार्ग ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला रोख रक्कम 3000 स्मृती चषक फिरती ढाल  प्रमाणपत्र तर द्वितीय क्रमांक राणी पार्वती देवी ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी ने पटकावला. रोख रक्कम 2000 स्मृती चषक प्रमाणपत्र देण्यात आले.  तृतीय क्रमांक बी. एम. गोगटे ज्युनिअर कॉलेज शिरोडाने पटकावला. रोख रक्कम 1000 स्मृती  चषक  व प्रमाणपत्र  देण्यात आले.  तर  सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आली.

यावेळी स्पर्धेच्या सहा फेरी घेण्यात आल्या व त्यातून विजयी स्पर्धकांना निवडण्यात आले. या स्पर्धेसाठी विज्ञान शाखेतील सर्वच शिक्षकांनी मोलाचं सहकार्य केले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. टोपले मॅडम यांनी काम केले तर या कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी मानले.