मंत्री केसरकरांच्या वाढदिवसानिमित्त मेगा ऑर्थोपेडीक कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

100 पेक्षा जास्त रुग्णांनी घेतला शिबीराचा लाभ
Edited by: विनायक गावस
Published on: July 19, 2023 14:53 PM
views 204  views

वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना, सावंतवाडी मतदारसंघ व दिपकभाई केसरकर मित्र मंडळ यांच्यावतीने लोकमान्य हॉस्पीटल पुणे यांच्या सौजन्याने आयोजित मोफत मेगा आर्थोपेडीक कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. १०० पेक्षा जास्त रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला. हे शिबीर ग्रामीण रुग्णालय शिरोडा येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले.

    यावेळी वेंगुर्ले शिवसेना प्रमुख नितीन मांजरेकर, शिवसेना जिल्हा संघटक सुनील डुबळे, माजी पंचायत समिती सदस्य उमा मठकर, माजी जिल्हा बँक संचालक राजन गावडे, डॉ. प्रसाद साळगांवकर, रेडी उपसरपंच नमिता नागोळकर, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, दिलीप मठकर, माजी उपसरपंच दत्तगुरु परब, एकनाथ नारोजी, अमित गावडे, ग्रा प माजी सदस्य कौशिक परब, बाबा सारंग, ग्रामपंचायत माजी सदस्य प्राची नाईक, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ प्रवीण देसाई, डॉ. लोटलीकर, डॉ प्रदीप शेटकर, डॉ आकाश माने, डॉ.शशिकांत दिंडे आदी उपस्थित होते. 

  यावेळी पुणे येथील टीमच्या डॉ. अश्विन मडावी, डॉ प्रसाद भिम्बरवाड, कौन्सेलर सचिन पवार, राज सावंत, चेतन काळे, एक्स रे साठी सुदर्शन सुतार आदींनी रुग्णांची तपासणी केली.