जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 11, 2024 14:32 PM
views 93  views

कणकवली : युवा संदेश चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन रविवार दिनांक 11 फेब्रुवारीला माध्यमिक विद्यालय कनेडी येथे संपन्न झाले. याप्रसंगी संजना सावंत, विभागीय अध्यक्ष विजय भोगटे, कलाशिक्षक प्रसाद राणे, मुख्याध्यापक सुमन दलवी, केंद्र प्रमुख उत्तम सुर्यवंशी, सरपंच बाबू सावंत, सुनिल गावकर, संतोष गावकर, मयुरी मुंज, पवार, परिसरातील शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीन गटात घेण्यात आलेल्या या चित्रकला स्पर्धेत जिल्हाभरातून 376 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मंगलवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६:०० वा कनेडी बाज़ारपेठ येथे आयोजित करण्यात येणार आहे. यावेली गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री संदीप तांबे, नरेंद्र चिंदरकर, अजय सावंत, दयानंद गावकर, नितीन सातवसे यांनी विशेष मेहनत घेतली