
कणकवली : कणकवली तालुक्यातील लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या माध्यमातून कै. प्रमोद परब स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल 45 दात्यांनी रक्तदान केले. लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून मागील 21 वर्ष सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून दरवर्षी सामाजिक उपक्रम देखील या मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येतात.
रक्तदान शिबिराचा शुभारंभ पंचायत समिती सदस्य लक्ष्मण गावडे, डॉ श.दिलीप घाडीगावकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी हळवल सरपंच अपर्णा चव्हाण, उपसरपंच प्रभाकर राणे, अशोक परब, विजय परब, सुभाष परब, संतोष गुरव, शशिकांत राणे, शिवा राणे, सत्यवान गावडे, जनार्दन गावडे, बाळकृष्ण लाड, राजेंद्र गावडे, आप्पा परब, हळवल ग्रामसेविका वर्षा कदम, आरोग्य अधिकारी सौ. अश्विनी तावडे, आरोग्य सेविका सौ. कदम, आशा सेविका प्रियांका तावडे जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग रक्तपेढी विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहीत दातार, सुमंगल बुगडे, नितीन तुरतर, जान्हवी तायशेटे, कांचन परब,सागर सावंय नितीन गावकर मंडळाचे अध्यक्ष लवू परब, अरुण राऊळ, सचिव दिपेश परब, दिपक राऊळ, दशरथ परब सतीश गावडे प्रशांत गावडे, भरत गावडे, विकास गावडे, गिरीश परब, महेश परब, शैलेश परब, रोहित राणे, ऋषिकेश गावडे, अक्षय गावडे, विक्रांत परब, रोशन राणे, सागर राणे, अमोल केतकर, अक्षय परब, सचिन परब, गणेश गावडे, ऋषी राऊळ, सुरज गावडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कै. प्रमोद परब यांना स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश परब यांनी केले तर आभार दिपक राऊळ यांनी मानले.










