
दोडामार्ग : साटेली भेडशी येथे बाबा टोपले मित्रमंडळाच्या वतीने आयोजित नरकासुर स्पर्धेला दोडामार्ग तालुक्यातुन भरभरुन प्रतिसाद मिळाला. गेली अनेक वर्ष सामाजिक, राजकीय, क्रीड़ा व सांस्कृतीक क्षेत्रात अग्रक्रमाने काम करणारे भेडशीतील युवा उद्योजक दत्ताराम (बाबा) टोपले गेली अनेक वर्षे भव्यदिव्य नरकासुर स्पर्धा आयोजित करत असतात .याही वर्षी त्यानी अनोख्या पध्दतीने स्पर्धा साजरी केली. या स्पर्धेत कोणाळ मित्रमंडळ यांचा नुसारकासूर प्रतीकृतीचा प्रथम क्रमांक आला.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी बाबा टोपले मित्रमंडळाने तालुका स्तरीय नरकासूर स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचे उद्घाटन जेष्ठ ग्रामस्थ कालिदास भणगे यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रगतिशील शेतकरी तथा देवस्थानचे जेष्ठ मानकरी अनिल मोरजकर यांचा नंदकिशोर टोपले व बाबा टोपले यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धे दरम्यान उपस्थित भेडशी व्यापारी तसेच मित्रमंडळींचे स्वागत करण्यात आले. बाबा टोपले यांचे स्पर्धा आयोजित करण्या मागचा हेतु म्हणजे युवकांना व्यासपीठ देण्याचा असतो. या उपक्रमाचे सर्व स्तरातुन बाबा टोपले यांचे कौतुक करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये कोनाळ येथील युवकांनी प्रथम क्रमांक प्राप्त करत ८ हजार रुपये द्वितीय क्रमांक प्राप्त झरेबांबर काजुळवाडी यांनी ५ हजार रुपये तर तृतीय क्रमांक प्राप्त आंबेली दोडामार्ग व थोरलेभरड यांना ३ हजार रुपये तर उत्तेजनार्थ भेडशी मित्रमंडळ यांना २००० रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.तसेच यावेळी ग्रामविकास कमिटी भेडशीचे अध्यक्ष तुकाराम गंगाधर टोपले यांची कन्या कु धनश्री तुकाराम टोपले जीने वकीली पदवी प्राप्त केल्या बद्दल सौ.गौरी दत्ताराम टोपले,सौ सुजाता नंदकिशोर टोपले,सौ सुशांती रोहीत टोपले यांच्या हस्ते तीचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक चंदन गांवकर, राकेश भोळे यांनी विशेष उपस्थिति दर्शविली. या स्पर्धेत अभिजीत म्हाप्सेकर, नागेश टोपले यांनी विशेष सहकार्य लाभले. या स्पर्धेचे परिक्षण दोडामार्ग नगरपंचायतचे नगरसेवक चंदन गांवकर, राकेश भोळे,सौ.गौरी दत्ताराम टोपले, सुजाता नंदकिशोर टोपले, सुशांती रोहित टोपले व वैष्णवी वदन टोपले यांनी केले.बाबा टोपले यांच्या निवासस्थानी ही स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.