
देवगड : देवगड येथील स्वामी समर्थ मठ हडपीडचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांच्या वतीने आयोजित अक्कलकोट दर्शन सोहळ्याला उत्स्फूर्त असा भाविकांकडून प्रतिसाद मिळाला यावेळी मुंबईतील स्वामी भक्तांंस तसेच सिंधुदुर्ग येथील स्वामी भक्तांस घेऊन नुतन वर्षाचे औचित्य साधून श्री.स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण, स्वामीरत्न पुरस्कार सन्माननीत नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांनी अक्कलकोट दर्शन सोहळा आयोजित केला होता.
अक्कलकोट दर्शन सोहळ्याच्या प्रसंगी मान्यवरांना शाल श्रीफळ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. वटवृक्ष देवस्थानाचे अध्यक्ष.महेश इंगळे समाधी मठातील चोळप्पा महाराजांचे सोळावे वंशज श्री.अन्नु गुरूजी,अन्नछत्राचे संस्थापक श्री.जन्मेजयराजे भोसले, युवराज श्री.अमोल राजे भोसले यांनी सुद्धा नंदकुमार पेडणेकर यांचे स्वागत करत उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.
यावेळी अक्कलकोट वटवृक्ष देवस्थान मठात प्रसिद्ध गायक श्री.बाळा कांबळी, श्री.शंकर ला. सावंत, सुनील सुर्वे,गायक वादक श्री.पप्पु पांचाळ आणि सर्व स्वामी भक्त यांनी स्वामी नामाच्या गीतांचा कार्यक्रम सादर केला.वटवृक्ष देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे यांचे मोलाचे सहकार्य मीळाले. तसेच पुरातन श्री शुभ्राय महाराज मठ, सोलापूर येथे स्वामी सेवा म्हणून भजन करण्यात आले.