नांदगावातील कला महोत्सवाला कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचं आयोजन
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: July 29, 2025 11:33 AM
views 79  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने नांदगाव आज पहिल्या श्रावण सोमवार निमित्त आयोजित केलेल्या कला महोत्सवला कलाकारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. भजनी बुवा, मूर्तिकार, नाट्य कलाकार यांनी सहभागी होत आपली कला सादर केली.

यावेळी या महोत्सवाला कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष बुवा संतोष कानडे यांची विशेष उपस्थिती लाभली. 

 व्यासपीठावर नांदगाव सरपंच भाई मोरजकर, नांदगाव पंचायत समिती माजी सदस्या हर्षदा वाळके, किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, ट्रस्टचे उपाध्यक्ष भाई मोरये , संतोष मिराशी बुवा, माजी उपसरपंच निरज मोरये, कासार्डे बिट अंमलदार चंद्रकांत झोरे, स्वप्निल जाधव, हनुमंत वाळके, रविंद्र तेली, ग्रामपंचायत सदस्य बुवा शंकर मोरये, बबन मोरये, मारुती मोरये, मंगेश मोरये, सदानंद बिडये, ज्येष्ठ बुवा आत्माराम घाडी, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू तांबे, कमलाकर पाटील, राजू तांबे, भुपेश मोरजकर, निलेश मोरये, आदी उपस्थित होते. तसेच रसिक प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती.

सर्व सहभागी कलाकारांना सहभाग प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी वृद्ध कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष बुवा संतोष कानडे बोलताना म्हणाले की, किशोर मोरजकर ट्रस्ट ने  कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा उपक्रम राबविला याबद्दल खरोखरच ट्रस्टला धन्यवाद देत आहे. कै. किशोर मोरजकर यांचे 11 वर्षांपूर्वी प्रस्ताव मंजूर न झाल्याने जी परवड झाली ती उणीव भरून काढण्यासाठी त्यांच्या स्मरण म्हणून आपण एका ज्येष्ठ कलाकाराचे नाव ट्रस्ट ने सुचवावे व तो प्रस्ताव याच वर्षात मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ही शेवटी सांगितले.

किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट ज्यांच्या नावाने सुरू केले ते किशोर मोरजकर यांनी 2009 साली कलाकार मानधन साठी अर्ज दाखल केला होता. पण मंजुरी पूर्वी 2014 साली त्यांचे निधन झाले. त्यांना एक वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना पेन्शन मंजूर झाल्याचे लिस्ट मध्ये नाव जाहीर करण्यात आले. परंतु ते मयत झाल्याने आणि त्यांच्या पत्नीही अगोदरच मयत असल्याने सदर मंजूर मानधन रक्कम रद्द करण्यात आली अशी वेळ एखाद्या कलाकारावर येवू नये म्हणूनच कला महोत्सव आयोजित करून सहभागी सर्व कलाकारांना प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचे ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी सांगितले. हे प्रमाणपत्र पेन्शन योजनेसाठी उपयुक्त ठरणार आहे.

आजच्या कला महोत्सव मध्ये सर्व आजूबाजूचे भजनी बुवा, नाट्य कलाकार यांनी सहभागी होत कला सादर केली. तसेच बुवा संतोष कानडे, बुवा संतोष मिराशी यांनीही लोक आग्रहास्तव गौळण सादर केली.