
कणकवली : शहरात मंगळवारी ठिकठिकाणी रंगपंचमी साजरी करण्यात आली. रंगोत्सवात अबलावृद्धांसह सहभागी रंग उधळण्याचा आनंद लुटला. ढालकाठी मित्रमंडळाने ढालकाठी मंदिर परिसरात रंगोत्सवाचे आयोजन केले होते. शहरातील बाजारपेठ महापुरुष मित्रमंडळाचा वतीने महपुरूष मंदीर नजिक रंगोत्सव साजरा करण्यात आला यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत ऑर्केस्ट्रा सोबत रेन शॉवरने रंगोत्सव साजरा करण्यात आला. पटकी देवी मित्र मंडळाच्या वतीने देखील रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला. एकंदरीतच शहरात विविध ठिक- ठिकाणी रंगांची उधळण करत बाल चिमुकले याच्यासहित अबालवृद्ध देखील या रंगपंचमी उत्सवात सहभागी झाले होते. रंगपंचमी नमित्त शहरवासीयांनी एकमेकांवर रंगांची उधळण केली. हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
तुझेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगराध्यक्ष समीर नलावडे व जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्य सावंत यांच्या संकल्पनेतून रंगोत्सवाचे आयोजन केले होते. या उत्सवात बच्चेकंपनीसह महिला व पुरुष सहभागी झाले होते. यात त्यांनी एकमेकांवर रंगांची उधळून करून रंगोत्सवाचा आनंद लुटत कणकवली रंगपंचमी साजरी झाली