SPK तील प्रोजेक्ट एक्स्पोला भरघोस प्रतिसाद !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 17, 2024 09:30 AM
views 82  views

सावंतवाडी : श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाने आयोजित केलेल्या प्रोजेक्ट एक्स्पो 2K24 ला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या  चेअरमन राणीसाहेब शुभादादेवी भोंसले यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे सहाय्यक संचालक अॅड.शामराव सावंत, कॉलेज चे प्रभारी  प्राचार्य प्रा.एम. ए. ठाकूर  उपस्थित होते.


प्रोजेक्ट स्पर्धे मध्ये प्रथम क्रमक भोसले नॉलेज सिटी iot स्मार्ट क्लासरूम पारस सावळ आणि स्ताफुरोज मोंटरिया, द्वितीय क्रमांक श्री पंचम खेमराज  महाविद्यालयाचा 'दशावतार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म' तृतीय क्रमांक संत राऊळ महाराज महाविद्यालयाची वैष्णवी कानेकर, पर्सनल असिस्टंट अॅप्लिकेशन यांना प्राप्त झाला.

स्पर्धेचे मूल्यांकन भोसले नॉलेजे  सिटीचे  डाॅ.रमण बाने आणि, कणकवली कॉलेज, कणकवली चे  प्रा.अमरिश सातोसे यांनी केले  तसेच फिजिक्स विभाग प्रमुख डाॅ. योगेश चौधरी आणि  डाॅ.संदीप पाटील  उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयटी विभागाचे प्रा. ए ए वर्दंम यांनी केले.कार्यक्रमासाठी विदयार्थी प्रतिनिधी प्रज्वल मुठ्ये, आयटी विभागाच्या विभागप्रमुख   प्रा.सौ.अक्षता गोडकर, प्रा.स्नेहल नाईक,प्रा. तन्वी शिंदे ,प्रा. सिद्धिविनायक सावंत तसेच कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या विभागप्रमुख प्रा.सौ.विभा गवंडे , प्रा.प्रणाम कांबळी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एल.भारमल  तसेच संस्थेच्या सर्व सदस्यांचे मार्गदर्शन लाभले.