
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथील ग्रंथालयात काम करणारया ग्रंथालय परिचर सौ.प्राची परब या आपल्या नियत वयोमानानुसार महाविद्यालयामधून सेवाानवृत्त झाल्या. त्यांनी महाविद्यालयात एकूण 33 वर्षे सेवा केली. महाविद्यालयाच्यावतीने त्यांचा आज सत्कार करण्यात आला. संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब श्रीमंत सौ. शुभदादेवी भोंसले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, सहसंचालक अॅड. शामराव सावंत, सदस्य डॉ. सतीश सावंत ,महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. एम ए ठाकूर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य प्रा. एम ए ठाकूर यांनी केले. सौ प्राची परब या आपल्या कामामध्ये तत्पर असायच्या. ग्रथालयातील पुस्तक अन पुस्तक त्यांना माहीत असायचे. ग्रंथालयामध्ये त्यांनी उत्तम प्रकारे सेवा बजावली असे ते म्हणाले. अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सौ. नीलम धुरी यांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. त्यांच्या घराशी आपले जिव्हाळ्याचे संबंध होते याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
श्री. एम.डी सावंत, सौ आरती पेडणेकर, श्री ज्ञानेश्वर तळकटकर, प्रा. टी.व्ही. कांबळे, डाॅ. सौ सुनयना जाधव यांनीही आपली मनोगते व्यक्त केली , त्यांंची स्वभाव वैशीष्ठ्ये सांगितली. संस्थेचे सहसंचालक अॅड. शामराव सावंत यांनी त्यांचा शांत स्वभाव, कामातील तत्परता याबद्दल आपल्या मनोगतात आवर्जुन उल्लेख केला. सत्काराला उत्तर देताना सौ.प्राची परब यांनी राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोंसले, राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले व विद्यमान राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले,राणीसाहेब सौ शुभदा देवी भोंसले यांच्या प्रति आदर व्यक्त केला व त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रा.आर के शेवाळे यांनी केले. आभार डॉ. जी एस मर्गज यांनी मानले.