
वैभववाडी : श्री काडसिध्देश्वर सांप्रदाय गुरू भक्त मंडळ भुईबावडा यांच्यावतीने गुरुवार ८ मे रोजी भुईबावडा येथे अध्यात्म सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येथील श्री आकोबा नारायण मोरे (बाबू पाटील) यांच्या घरी हा सोहळा संपन्न होणार आहे.
प.पु. अदृष्य काडसिद्धेश्वर स्वामी या सोहळ्याला उपस्थित राहून भक्तांना दर्शन देणार आहेत. या कार्यक्रमाचा प्रारंभ सकाळी १० वा. सांप्रदायीक भजनाने होणार आहे. त्यानंतर सायं ५ वा. परमपूज्य श्री स.स.स. काडसिध्देश्वर स्वामींचे आगमन होणार आहे. संध्याकाळी.५.३० वा. सांप्रदायीक भजन होणार आहे. त्यानंतर स्वामींचे चरण दर्शन कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७वा. सत्संग कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वामींचे आगमन होणार आहे. रात्री ८ते ९वा. या वेळेत परमपूज्य श्री स.स.स अदृष्य काडसिध्देश्वर स्वामी महाराजांचे प्रवचन होणार आहे. भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री काडसिध्देश्वर सांप्रदाय गुरू भक्तमंडळ भुईबावडा पंचक्रोशी व आकोबा नारायण मोरे यांनी केले आहे.