LIVE UPDATES

चाकरमान्‍यांसाठी खुशखबर, उन्‍हाळी सुट्‍टीनिमित्त विशेष रेल्‍वेची घोषणा

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: May 21, 2026 19:57 PM
views 33  views

कणकवली : सध्‍या उन्‍हाळा सुट्‍टीचे दिवस असून या कालावधीत प्रवाशांची गर्दीही वाढली आहे. याबाबात रेल्‍वे प्रशासनाने अनेक जादा रेल्‍वे गाड्याही सोडल्‍या आहेत. मात्र, तरीही या गाड्या फुल्‍ल भरून वाहत असल्‍याने आता मडगांव ते पनवेल अशी 'अप' व 'डाऊन' प्रकारात दोन दिवसीय गाडी सोडण्‍यात येणार आहे.

मडगांव – पनवेल (०११०६) ही गाडी रविवार, २४ व ३१ मे रोजी सायंकाळी ४.३० वा. मडगांव येथून सुटेल व सोमवारी पहाटे ४ वा. पनवेल येथे पोहोचोल. पनवेल – मडगांव (०११०५) ही गाडी सोमवार, २५  मे व १ जूनला सकाळी ५.४५ वा. पनवेल येथून सुटेल व त्‍याच दिवशी सायंकाळी ६.१० वा. मडगांव येथे पोहोचेल. गाडीला करमळी, थिविम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, विलवडे, आडवली, रत्‍नागिरी, संगमेश्‍‍वर रोड, चिपळूण, खेड, माणगांव, रोहा, पेण या स्‍थानकांवर थांबा असल्‍याची माहिती कोकण रेल्‍वे प्रशासनाने दिली आहे.