
सावंतवाडी : कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांना प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन मुंबई सीएसटी - मडगाव गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी ७ नोव्हेंबर रोजी मुंबईहून सुटणार आहे.
मध्य रेल्वेने कोकण रेल्वेमार्गावर ही गाडी सोडण्याचे ठरविले आहे. ही गाडी केवळ एकच दिवस धावणार आहे. मुंबई- सीएसटी येथून ही गाडी (०१४२७) ७ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री १२:२० वाजता सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी मडगावला दुपारी १२:१५ वाजता पोहोचणार आहे. या गाडीला एकूण १७ डबे असून ती दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आणि करमाळी या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीचे आरक्षण सुरू करण्यात आले असून प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे एका दिवसासाठी ही विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे.