अल्प दरात विशेष लक्झरी बसेसची सोय | अर्चना घारे - परब यांचा पुढाकार

Edited by: विनायक गावस
Published on: September 17, 2023 18:55 PM
views 128  views

सावंतावडी : गणेशोत्सव म्हणजे आपल्या कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा उत्सव, या निमित्ताने शहरात राहणारे चाकरमानी आपापल्या गावाला येतात उत्सवात सहभागी होतात. या काळात बस, रेल्वेला होणाऱ्या गर्दीमुळे काही प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.

पुणे-पिंपरी चिंचवड परीसरातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना हा त्रास सहन करावा लागू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्यावतीने आणि सिंधुदुर्ग युवा ग्रुप पिंपरी - चिंचवडच्या सहकार्याने अल्प दरात विशेष लक्झरी बसेसची सोय करण्यात आली. याचा शुभारंभ अर्चना घारे-परब यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी अनेक प्रवाशांची या माध्यमातून सेवा करता आली याच समाधान आहे अशी भावना अर्चना घारे यांनी व्यक्त केली.