LIVE UPDATES

कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Edited by:
Published on: June 18, 2025 20:41 PM
views 46  views

सिंधुदुर्गनगरी : कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे  हे गुरुवार दि.१९ जून २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

जिल्ह्यातील गुन्हे आढावा, कायदा व सुव्यवस्थेचा ते आढावा घेणार असून दुपारी १२ ते २ पर्यंत अभ्यागतांना भेटणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक,स्थागुअशा तथा सह जनसंपर्क अधिकारी सचिन हुंदळेकर यांनी दिली आहे.