देव्या सुर्याजी यांचा विशेष सन्मान

Edited by: विनायक गांवस
Published on: September 29, 2024 13:38 PM
views 167  views

सावंतवाडी : ११९ वर्षे जुन्या गणेशोत्सव मंडळ,सालईवाडा सावंतवाडी तर्फे गोवा बांबोळी रक्तपेढीमध्ये जाऊन बायपास सर्जरी रुग्णांसाठी लागणा-या फ्रेश रक्तासाठी कायम रक्तदान करणारे युवा रक्तदाते वसंत सावंत ,अथर्व सावंत ,सुमित मळीक, संदेश नेवगी,नाविद हेरेकर या रक्तदात्यांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. तसेच युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. राजेश गुप्ता  यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राजा स्वार, अभय नेवगी, साबाजी नार्वेकर, श्री. बांदेकर यांसह गणेशोत्सव मंडळ,सालईवाडाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.