
सावंतवाडी : भारतीय डाक विभागाकडून श्री रामजन्मभूमी मंदिराच भारतीय डाक तिकीट भेट स्वरूपात देत युवा रक्तदाता संघटनेचा सन्मान केला. संघटनेच्या माध्यमातून सामाजिक व रक्तदान क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा गौरव भारतीय डाक विभागाकडून करण्यात आला. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांना सावंतवाडी डाक विभागाचे दिनेश सावंत यांनी हे श्री रामजन्मभूमी तिकीटाच सन्मानचिन्ह देत गौरव केला. याबद्दल युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी भारतीय डाक विभागाचे आभार मानले आहेत.