
मंडणगड : महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांर्तगत मंडणगड तालुका आरोग्य विभागाचे विशेष आरोग्य तपासणी मोहीम तालुक्यात राबवण्यात आली आहे. 1 ते 31 मार्च 2025 या एक महिन्याचे कालवधीत तालुक्यातील शाळा व अंगणवाडी स्तरावर बालकांची आरोग्य तपासणी सुरु आहे. या मोहीमेचे उद्घाटन नुतन विद्यामंदिर मंडणगड येथे गटविकास अधिकारी विशाल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तपासणी पथकात डॉ. शरण काठोळे, वैद्यकीय अधिकारी पंदेरी, डॉ. उदय नागपूरे, डॉ. रुपाली नागपूरे तसेच समुदाईक आरोग्य अधिकारी, औषध निर्माण अधिकारी व आरोग्य सेविका यांचा समावेश आहे.
या मोहीमेत 1 मार्च 19 मार्च 2025 पर्यंत नुतन विद्यामंदिर, गोठे हायस्कुल, देव्हारे दक्षिणवाडी, गोठे खलाठी, नँशनल उर्दु हायस्कुल लाटवण, पिंपळगाव, बाणकोट उर्दू, जर्मन पराकर हायस्कुल बाणकोट, इमानदार पब्लिक स्कुल वेसवी, गांधी चौक, अडखळ, मालेगाव, केरीळ, नायणे, गणेशकोंड, गवळवाडी, रातांबेवाडी, पाचरळ, आंबवणेबुद्रुक, पालेकोंड, पाले गावठाण, म्हाप्रळ मोहल्ला, घराडी, पालघर, धुत्रोली, धुत्रोली मोहल्ला, पंदेरी सोनारावाडी, पंदेरी गावठाण, माहु तांबीटकरवाडी, पालवणी, जांभुळनगर, गोसावीवाडी येथील शाळांमधील बालकांची आरोग्य तपासणी कऱण्यात आली आहे.
20 मार्च 2025 रोजी कोन्हवली, सावरी गावठाण, सावरी केळेवाडी, कोन्हवली, 21 मार्च 2025 रोजी वाल्मिकीनगर, 22 मार्च 2025 रोजी संदर्भीत विद्यार्थी तपासणी, 24 मार्च 2025 रोजी निगडी मोहल्ला, 26 मार्च 2025 रोज संदर्भीत विद्यार्थी शिबीर आयोजीत कऱण्यात आली आहे. तरी तालुक्यातील सर्व पालकांनी आपल्या पाल्याची तपासणी करुन घ्यावी असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांनी केले आहे.